Welcome to Souq Ecommerce Store !
विचार बदला जीवनाची दिशाही बदलेल
माझा महाराष्ट्र वृत्तसेवा स्पेशल
Inspirational story

एक खूप श्रीमंत माणूस होता. पण त्याच्याकडे असलेल्या संपत्ती एवढे त्याचे मन मोठे नव्हते. एखाद्याला पैसे दिले तर स्वत:चे मोठेपण तो १० लोकांना जाऊन सांगयचा. तो जेथे-जेथे जायचा तेथे आपण किती दानशूर आणि दयाळू आहोत याबद्दल सांगायचा.

एके दिवशी शहरात थोर विचारवंत आले असल्याचे त्याला कळले. तो त्वरित त्यांना भेटायला गेला. त्या श्रीमंतमाणसाचे आदरातिथ्य केल्यावर त्या थोर विचावंताने त्याला भेटायला येण्याचे कारण विचारले. मात्र आपले येण्याचे कारण न सांगता तो स्वत:च्या संपतीचे आणि दानशूरतेचे गोडवे गाऊ लागला
त्याच्या दानशूरपणाच्या गोष्टी सांगून झाल्यावर त्या श्रीमंत माणसाने पैशाचे पाकिट काढून थोर विचारवंताला देऊ केले आणि म्हणाला, 'तुम्हाला पैशाची गरज आहे असे मला वाटले म्हणून मी हे आणले आहे.' हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात वेगळात अहंकार दिसत होता. त्या थोर विचारवंत पैशाचे पाकिट बाजूला करत म्हणाले, 'मला या पैशांची नव्हे तर तुझी गरज आहे.' हे ऐकून तो श्रीमंत माणूस दुखावला गेला. मी दिलेले पैसे यांनी नाकरण्याचा हिंमत कशी केली. आतापर्यंत मी दिलेले पैसे कोणीही नाकरण्याचे धाडस केले नाही, असे तो मनातल्या मनात म्हणाला.

तेवढ्यात थोरविचावंत म्हणाले, 'तुला माझ्या वागण्याचे वाईट वाटले असेल ना!' तो श्रीमंत माणूस म्हणाला, 'वाईट तर वाटणारचं. मी देऊ केलेली मदत तुम्ही नाकारलीत जणू काही मी हे पैसे नाही तर माती आहे.' हे ऐकून ते विचारवंत म्हणाले, 'हे पाहा महाशय, दात्याने केवळ पैसे देले आणि स्वत:ला अर्पण कले नाही तर त्याचे मोल माती प्रमाणेच असते. दान या शब्दाचा खरा अर्थ आहे की, कोणत्याही असलेल्या गोष्टीचे समान भाग करुन अर्धी गोष्ट दुसऱ्याला देणे. है पैसे जे तू मला दिलेस ते काही सगळेच तुझे नाहीत. हे पैसे तू दान करतोस यात अभिमान काय बाळगायचा? हे तर तू केलेल्या चोरीचे प्रायश्चित केल्या सारखे आहे.'

हे ऐकून त्या धनिकाचा अहंकार तुटला आणि त्याचे विचार बदलले.

Join WhatsApp group

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: